‘बचत गटामध्ये सहभागी न झाल्यास लाडक्या बहि‍णींना लाभ नाही’

‘बचत गटामध्ये सहभागी न झाल्यास लाडक्या बहि‍णींना लाभ नाही’ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक येथे ग्रामसेवकाने काढलेल्या एका अजब फतव्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. गावातील महिलांनी जर बचत गटामध्ये सहभाग घेतला नाही, तर त्यांना राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार नाही, असा इशारा या फतव्याद्वारे देण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक महिलांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ADS किंमत पहा ×

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, गावातील एका ग्रामसखीने बचत गटातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी ग्रामसेवकांकडे विनंती केली होती. या विनंती अर्जाची कोणतीही शहानिशा न करता, ग्रामसेवकांनी थेट गावात दौंडी पिटवून महिलांना धमकी वजा सूचना दिली. यामध्ये केवळ लाडकी बहीण योजनेचा लाभच नव्हे, तर रेशनचे धान्य आणि इतर शासकीय योजनांचे लाभही बंद केले जातील, असे जाहीर करण्यात आले आहे. केवळ बचत गटात सहभागी न झाल्यामुळे अशा प्रकारे सरकारी योजनांपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे.

Leave a Comment