मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात…

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर नोव्हेंबर महिन्याचा थकीत हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून आधार डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे हे पैसे वितरित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. यामुळे गेल्या काही काळापासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

ADS किंमत पहा ×

राज्यामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या हप्त्याचे वितरण रखडले होते. सुरुवातीला असा अंदाज वर्तवला जात होता की, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते निवडणुकीनंतरच एकत्रित दिले जातील. मात्र, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यास आता सुरुवात झाली असून, आचारसंहितेच्या काळात या वितरणासाठी कशा प्रकारे परवानगी मिळाली किंवा शिथिलता देण्यात आली, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment