रेशन कार्ड नवीन नियम : रेशन कार्डातून नाव कमी होणार ; २०२६ मध्ये रेशन कार्डाबाबत नवीन नियम लागू होणार असून, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी (eKYC) पूर्ण केलेली नाही, अशा व्यक्तींची नावे रेशन कार्डमधून कमी केली जाण्याची शक्यता आहे. रेशन कार्डावर मिळणारे धान्य आणि इतर शासकीय योजनांचे लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी रेशन कार्डातील प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी अपडेट असणे आता अनिवार्य झाले आहे. एआयच्या (AI) युगात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे.
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी रेशन कार्डातील सर्व सदस्यांना त्यांच्या आधार कार्डसह जवळच्या कोणत्याही रेशन दुकानदाराकडे जावे लागेल. तिथे प्रत्येक सदस्याला स्वतःचा अंगठा लावून बायोमेट्रिक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विशेष म्हणजे, तुम्ही सध्या ज्या गावात किंवा शहरात वास्तव्यास आहात, तिथल्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी मूळ गावी जाण्याची आवश्यकता नाही.















