लाडक्या बहिणींसाठी eKYC ला मुदतवाढ, नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते मिळणार एकत्र?

लाडक्या बहिणींसाठी eKYC ला मुदतवाढ, नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते मिळणार एकत्र? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ‘ई-केवायसी’ (e-KYC) प्रक्रियेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी सरकारने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती, परंतु राज्यातील सुमारे ४५ लाख महिलांची केवायसी अद्याप प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांची केवायसी अपूर्ण आहे, त्यांचा लाभ थांबण्याची शक्यता असल्याने ही मुदतवाढ महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

ADS किंमत पहा ×

अनेक महिलांना पती किंवा वडील नसल्यामुळे केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून सरकारने अशा महिलांसाठी एक स्वतंत्र नवीन संकेतस्थळ (Website) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांची माहिती उपलब्ध नाही, त्यांची माहिती या नवीन पोर्टलद्वारे वेगळ्या पद्धतीने संकलित केली जाणार आहे. यामुळे तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही पात्र महिलेचा लाभ थांबणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे.

Leave a Comment