लाडक्या बहीणींनो पुन्हा KYC करावी लागनार..नसता हप्ते बंद – पहा सविस्तर

लाडक्या बहीणींनो पुन्हा KYC करावी लागनार..नसता हप्ते बंद – पहा सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सध्या ‘ई-केवायसी’ (e-KYC) प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांतून “दुबार केवायसी करावी का?” किंवा “हप्ते बंद होणार का?” अशा अनेक अफवा पसरत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या महिलांनी यापूर्वीच आपली केवायसी अचूकपणे पूर्ण केली आहे, त्यांना ती पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्यांना आपल्या माहितीबद्दल किंवा अर्जातील उत्तरांबद्दल शंका आहे, त्या महिला दुरुस्तीसाठी पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ADS किंमत पहा ×

केवायसी प्रक्रियेत आता काही बदल करण्यात आले असून ती अधिक सोपी करण्यात आली आहे. नवीन अर्जामध्ये प्रामुख्याने दोन प्रश्न विचारले जात आहेत: तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का? आणि कोणाला निवृत्ती वेतन किंवा पेन्शन मिळते का? याशिवाय, विधवा, घटस्फोटित, अविवाहित किंवा एकल महिलांसाठी स्वतंत्र आणि सोपे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जर पूर्वी केवायसी करताना तांत्रिक अडचणींमुळे किंवा सर्वर डाऊन असल्यामुळे काही चुका झाल्या असतील, तर ही संधी साधून महिला आपली माहिती अपडेट करू शकतात.

Leave a Comment