MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द

MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द ; महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने’ अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. या योजनेसाठी २०२५-२६ या वर्षाकरिता १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून त्याद्वारे २६,९७२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा पूर्वसंमती मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या निवडीवर आता टांगती तलवार असून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

ADS किंमत पहा ×

राज्यात यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना शेततळ्याची कामे पूर्ण करणे किंवा कागदपत्रे सादर करणे शक्य झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर, शासनाने १९ जून २०२५ रोजी एक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली होती आणि त्यांचे अर्ज बाद न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही बहुसंख्य लाभार्थ्यांकडून प्रक्रियेत दिरंगाई होताना दिसत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, १३,७०५ लाभार्थ्यांनी अद्याप आपले कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेली नाहीत, ज्यामुळे योजनेचा मोठा निधी पडून आहे आणि गरजू प्रतीक्षा यादीतील शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment