Pm Kisan चा हप्ता होईल बंद, आजच करा हे काम ; पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ (प्रत्यक्ष पडताळणी) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. गेल्या काही हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून, अनेक शेतकरी या योजनेतून बाद झाले आहेत. जर तुमची पडताळणी पूर्ण झाली नाही, तर तुमचा येणारा हप्ता थांबवला जाऊ शकतो किंवा पूर्वीचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू होण्यास अडचण येऊ शकते.
या मोहिमेअंतर्गत कृषी विभागामार्फत संशयास्पद लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असणे, जमीन विक्री करूनही लाभ घेणे किंवा मयत व्यक्तींच्या नावावर हप्ते जमा होणे अशा प्रकरणांची तपासणी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते १२ व्या किंवा १९ व्या हप्त्यापासून बंद झाले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधून आपले नाव यादीत आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.















